Search This Blog

Monday, February 17, 2020

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती

अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
अध्याय ८:-  बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
अध्याय ११:- वाचादोष तसेच,वेड नाहीसे होते.
अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. तीर्थस्थळी यात्ररा पुण्य लाभते.
अध्याय २०:- पाप होईल नष्ट, ब्रह्मासमंध परिहरेल.
अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता.
अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात, सप्तथ सापडतो.
अध्याय २९:- स्त्रीछळदोष, वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.

अध्याय ३३:- वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते.
अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तूटलेले संबंध जुळतात.
अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
अध्याय ३९:- सद्गुगुरुंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते.
अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
अध्याय ४८:-  गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
अध्याय ५०:- ग्रंथी रोग, त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
अध्याय ५२ :- श्रद्धेला  चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.